ब्रिलियंट स्कुलस् नरंदेच्या जयदिप सुर्यवंशीला राज्यस्तरीय शालेय पॉवटलिफ्टींग स्पर्धेत रौप्य पदक

कुंभोज  (विनोद शिंगे)
नुकत्याच अकोला येथे झालेल्या राज्यस्तरीय पॉवरलिफ्टींग स्पर्धेमध्ये ब्रिलियंट स्कुलस् नरंदेचा विद्यार्थी जयदिप व्दारकेश सुर्यवंशी याने रौप्यपदक पटकावले. गेली सहा महीने ब्रिलियंट स्कुलस् नरंदे येथे आत्याधुनिक सोयी सह वेट लिफ्टींग चे ट्रेनिंग सेंटर .व्दारकेश सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केले आहे.

 

या सेंटर मध्ये एकुन दहा विद्यार्थ्यांना कोच अनिकेत माळी सर हे कोचिंग करत आहेत. वेट लिफ्टींग बरोबरच पॉवरलिफ्टींग चे ही प्रशिक्षण विद्यार्थ्यांना शास्त्रशुद्ध पद्धतीने देण्यात येत आहे. जयदिप सुर्यवंशी याने राज्यस्तरीय महाराष्ट्र स्टेट क्लासिक पॉवरलिफ्टींग चँपियनशिप २०२५ मिळविलेली आहे.
त्याच्या या यशात त्याचे वडील व्दारकेश सुर्यवंशी व आई रेश्मा सुर्यवंशी यांचे मोठे योगदान आहे. त्याच बरोबर ब्रिलियंट स्कुलस् नरंदेचे संस्थापक अध्यक्ष नितिन पाटील, मुख्याध्यापिकाशुभांगी पाटील, सुपरवायझर संदिप निकम,अधिक्षक किरण थोरात, कार्याध्यक्ष संजयसिंह पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.