मुंबई : बिजिंग येथे २५ मार्च २०२५ ला चौथे विश्व लिंग समानता व महिला सक्षमीकरण परिषद होत असून त्याअनुषंगाने मुंबई येथे कृती सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आरोयमंत्री प्रकाश आबिटकर यांनी राहून संवाद साधला.
मंत्री आबिटकर म्हणाले, मी ग्रामीण भागातून आलो आहे, एक सामाजिक संस्था चालवतो त्यामुळे तळागाळातील जनता आरोग्य सेवेसाठी नेमकी कोणत्या परिस्थितीला सामोरी जात आहे याची सर्व माहिती मला आहे. गर्भपात रोखण्यासाठी माहिती देणाऱ्या खबऱ्याला एक लाख रुपये देण्याची सरकारी बक्षीस होते. मात्र त्याची जाहिरात होत न्हवती. मी पदभार घेतला व पत्रकार परिषदेत माहिती दिली तेव्हा पत्रकारांनी बातमी मोठी केली.
सामान्य माणसाला चांगल्या आरोग्य सेवा सुविधा देण्यासाठी आपण काम करूया. कागदोपत्री कामे नको आहेत. आरोग्य विभागाने राज्य व जिल्हा पातळीवर आरोग्य समित्या नेमल्या आहेत त्या समितीच्या माध्यमातून राज्यातील महिला आरोग्य सेवेचे काम करून सामान्य माणसापर्यंत आरोग्य सेवा-सुविधा देण्यासाठी प्रयत्नशिल राहणार आहे.
यावेळी विधान परिषदेच्या सभापती डॉ.निलमताई गोऱ्हे यांच्यासह विविध क्षेत्रातील कार्यरत असलेल्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.