मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सायबर गुन्ह्यांमध्ये बळी पडलेल्या तक्रारदारांना प्रातिनिधिक स्वरुपात धनादेशाद्वारे परत

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड येथे, विविध प्रकारच्या सायबर गुन्ह्यांमध्ये बळी पडलेल्या तक्रारदारांना आरोपींकडून हस्तगत करण्यात आलेली रक्कम प्रातिनिधिक स्वरुपात धनादेशाद्वारे परत करण्यात आली. यावेळी तक्रारदार योगेश निलग यांना ₹22 लाख 50 हजार इतकी तर स्वप्ना विभुते यांना ₹19 लाख इतकी हस्तगत केलेली रक्कम परत करण्यात आली.

 

 

जानेवारी 2024 ते जानेवारी 2025 दरम्यान, 35 सायबर गुन्ह्यांमध्ये फसवणूक झालेल्या तक्रारदारांना, ₹4 कोटी 30 लाख रक्कम परत मिळवून देण्यात, पिंपरी-चिंचवड सायबर गुन्हे शाखेला यश मिळाले. या कारवाईदरम्यान 91आरोपींना अटक करण्यात आली.