विवेकानंद महोत्सवात विविध कार्यक्रम 

कोल्हापूर (पांडुरंग फिरींगे)
विवेकानंद कॉलेजने ‘विवेकानंद महोत्सव : शोध चैतन्याचा 2025’ या महोत्सवात विविध स्पर्धांचे आयोजन केले. स्पर्धांमध्ये अभिवाचन, सोलो डान्स, आयडियाथॉन, ऍड मॅड शो, रिल फ्लिक्स आणि मिस्टर & मिस विवेकानंद यांचा समावेश होता. महोत्सवात कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, सोलापूर, मुंबई येथील महाविद्यालयांचा सहभाग होता. विजेत्यांना रोख रक्कम व प्रमाणपत्रांनी सन्मानित करण्यात आले.

 

 

प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत फूड फेअर आणि फन फेअरचे उदघाटन झाले. स्पर्धेतील सर्व विजेत्यांना मान्यवरांच हस्ते पुरस्कार देण्यात आले.यावेळी कार्याध्यक्ष माजी प्राचार्य डॉ अभयकुमार साळुंखे, प्राचार्य डॉ आर.आर.कुंभार, सचिव शुभांगी गावडे,सिईओ कौस्तुभ गावडे, रजिस्टार आर.बी.जोग आदी उपस्थित होते.