श्री साई हायस्कूलचा सलग तिसऱ्यांदा राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक

कोल्हापूर –
क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व सोलापूर जिल्हा क्रीडा कार्यालय अंतर्गत नेहरू नगर ,शासकीय मैदान सोलापूर येथे घेण्यात आलेल्या १७ वर्षाखालील (मुली ) क्रिकेट स्पर्धेत नागपूर विभागाचा सलग तिसऱ्यांदा पराभव करून कोल्हापूर विभागाने प्रथम क्रमांक पटकावला यावेळी कोल्हापूर विभागाचे नेतृत्व श्री साई हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा संघाने केले.

 

 

 

तत्पूर्वी यास्पर्धेत महाराष्ट्रातील आठ विभागाने सहभाग नोंदविला. या स्पर्धेत प्रथम कोल्हापूर विभागाने मुंबई संघाचा पराभव केला. त्यामध्ये मुंबई विभागाने नाणेफेक जिंकू न प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला त्यांनी १० षटकात ६८ धावा केल्या उत्तरादाखल कोल्हापूर विभागाने ७ षटकात आव्हान परतवून लावले त्यामध्ये सुहानी कहांडळ हिने ५० धावा व २ विकेट घेतल्या व परिनिता पाटील हिने १४ धावा व १ विकेट घेतली . त्यानंतर सेमी फायनल सामना कोल्हापूर विभाग विरुद्ध पुणे याच्यामध्ये झाला.

यामध्ये कोल्हापूर विभागाने नानेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी चा निर्णय घेतला यामध्ये श्रृतिका पाटील हिने एका षटकात 3 फलंदाज बाद केले व पुणे संघ केवळ १० षटकात ४८ धावा करू शकला . उत्तरादाखल सुहानी कहांडळ हिने २९ धावा केल्या. व हा सामना कोल्हापूर विभागाने ९ षटकात जिंकला.
व फायनल सामना कोल्हापूर विभाग विरुद्ध नागपूर विभाग याच्यामध्ये झाला. यामध्ये नागपूर विभागाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला यामध्ये १५ षटकात कोल्हापूर विभागाने ९७ धावा केल्या. यामध्ये परिनिता पाटील हिने उत्कृष्ठ फलंदाजी व गोलंदाजी करत ३२ धावा व १ विकेट घेतली तसेच संस्कृती रसाळे व श्रृतिका पाटील हिने अनुक्रमे १९ व २० धावा केल्या उत्तरादाखल नागपूर संघ ७८ धावा पर्यंतच पोहचू शकला. व फायनल सामना कोल्हापूर विभागाने १९ धावांनी जिंकला. संपूर्ण सामन्यात सुहानी कहांडळ हिला मालिकावीर तर परिनिता पाटील हिला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. संपूर्ण सामन्यात श्रावणी पाटील संस्कृती रसाळे व श्रृतिका पाटील यांनी उत्कृष्ठ गोलंदाजी केली.

संघास श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री.मानसिंग ब्रोंद्रे (दादा),मानद सचिव श्रीमती संगीता ब्रोंद्रे (वहिनी ) ओ.एस श्री रूपेश खांडेकर,विष्णू चौगुले,विठ्ठल आंबले,
मनिष भोसले प्राचार्य श्री एस पी पाटील जिमखाना प्रमुख सौ . मनिषा पाटील *क्रीडा मार्गदर्शक श्री.सरदार पाटील,वर्षाराणी पाटील,श्री विनायक पवार व शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.

सहभागी खेळाडू –
श्रावणी पाटील(कर्णधार ), समीक्षा पाटील(उपकर्णधार ) प्राची कांबळे ,परिनिता पाटील , सुहानी कहांडळ,संस्कृती रसाळे, स्नेहा पटेल ,श्रृतिका पाटील , प्राची पाटील ,अनघा पिसे,तन्वी खळदकर,वेदिका पाटील , सानिका नाईक , जान्हवी चौगुले , सई वेल्हाळ, साक्षी पोतदार यांचा समावेश होता.

🤙 9921334545