कोल्हापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवी वर्षानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राच्यावतीने ‘शोध होळकरशाहीचा‘ या विषयावर दि. ३ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० ते ५.०० या कालावधीत एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागाच्या सभागृहात आयोजित या राष्ट्रीय चर्चासत्रात ज्येष्ठ लेखिका विनया खडपेकर यांचे बीजभाषण होणार असून विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. चर्चासत्रामध्ये डॉ.देवीदास पोटे, डॉ.प्रभाकर कोळेकर, सुमितराव लोखंडे, विनिता तेलंग, डॉ.रणधीर शिंदे, डॉ.संतोष पिंगळे, डॉ.अवनीश पाटील, रामभाऊ लांडे, डॉ.निलेश शेळके हे प्रमुख मार्गदर्शक असणार आहेत. कार्यक्रमास मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यासनाचे समन्वयक डॉ.मच्छिंद्र गोफणे आणि कुलसचिव डॉ.विलास शिंदे यांनी केले आहे.