विवेकानंदच्या 25 विद्यार्थ्यांची प्लेसमेंटव्दारे प्राथमिक निवड

पांडुरंग फिरींगे
कोल्हापूर :    विवेकानंद महाविद्यालय (अधिकारप्रदत्त स्वायत्त) कोल्हापूरच्या ट्रेनिंग व प्लेसमेंट सेल विभागाकडून दिनांक 22.01.2025 रोजी बजाज कॅपिटल, कोल्हापूर, रिलायन्स्‍ निपॉन लाईफ इन्शुरन्स्‍ आणि आय.बी.एफ. ॲक्सीस बँक, पुणे या तीन कंपन्यामध्ये भरतीसाठी मुलाखती झाल्या.यामध्ये एकूण कॉमर्स व मॅनेजमेंट शाखेच्या 70 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व त्यातून 25 विद्यार्थ्यांची प्राथमिक निवड करण्यात आली.   यावेळी बजाज कॅपिटलचे सिटी मॅनेजर अझिम शेख, आय.बी.एफ. (ॲक्सीस बँक) डेप्युटी मॅनेजर शुभांगी खुडे आणि रिलायन्स्‍ निपॉन लाईफ इन्शुरन्स्‍चे निलेश पांडेकर, सिनिअर टेरीटरी मॅनेजर हे उपस्थित होते.

 

 

 

वरील सर्व विद्यार्थ्याचे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा. अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिवा प्रा. शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी  कौस्तुभ गावडे यांनी अभिनंदन केले.

या निवडीसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष प्रमुख डॉ. श्रुती जोशी यांचे बहुमोल सहकार्य लाभले.

या प्लेसमेंट ड्राईव्हचे यशस्वी नियोजन करण्यासाठी ट्रेनिंग व प्लेसमेंट सेल चे प्रमुख प्रा. सतीश चव्हाण व सदस्य प्रा. संजय थोरात, डॉ. संजय लठ्ठे, डॉ. राजश्री पाटील, प्रा. विजय पुजारी, डॉ. अस्मिता तपासे, प्रा. पल्लवी देसाई, प्रा. राहुल इंगवले, प्रा व्ही. व्ही. मिसाळ, प्रा ए एल उपाध्ये, डॉ ए आर कासारकर यांनी विशेष परिश्रम घेतले. विवेकानंद कॉलेजचे रजिस्ट्रार श्री. आर.बी.जोग  व प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

🤙 9921334545