कुंभोज (विनोद शिंगे)
वाघवे (ता.पन्हाळा) येथे आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या विशेष प्रयत्नांतून ८० लाख रुपये खर्चून नव्याने बांधण्यात आलेल्या केंद्र शाळा विद्यामंदिर इमारतीचे लोकार्पण आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
शाळेची नवीन इमारत आणि सोयीसुविधा विद्यार्थ्यांना शिक्षणास उपयुक्त ठरणार आहेत. शाळेच्या नव्या इमारतीत शिक्षण घेता येणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंद आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झाले आहे.आज पेरलेले हे बीज उद्या ज्ञानरूपी वटवृक्षाच्या माध्यमातून समृद्धीची सावली निर्माण करणार आहे. तसेच चांगले शिक्षण हे चांगल्या भविष्याचा पाया असल्याचे मत आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी व्यक्त केले.
यावेळी पन्हाळा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी शिवाजी मानकर,कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक लक्ष्मण मुडेकर,पन्हाळा पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय माने,वाघवे गावचे सरपंच प्रदिप पाटील,उपसरपंच दिनकर साठे,दिलीप पाटील,प्रधान पाटील(सर),नागेश देशपांडे,पी.एस.पाटील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जयसिंगपाटील,एम.एम.पाटील,प्रभाकर पाटील (सर),एस.के.जाधव,गजानन विभुते,संजय पाटील,अर्जुन गायकवाड,मेजर अशोक कांबळे,गणेशपोवार,के.डी.शेलार,डी.बी.पाटील,युवराज पाटील,संजय सुतार,सुरेश पाटील,दत्ता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.