शासकीय उपक्रमांतर्गत मोफत एक्स-रे शिबिर शिरोली गावात संपन्न

कुंभोज (विनोद शिंगे)
100 दिवसीय उपक्रमांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र शिरोली पुलाची येथे मोफत एक्स-रे शिबिर आयोजित केले आहे.सतत येणारा ताप,वजन कमी होणे,छातीत दुखणे, थुंकीतून रक्त येणे,भूक मंदावणे इत्यादी आजाराचे निदान करणे करिता मोफत एक्स-रे तपासणी शिबिराचे उद्घाटन लोकनियुक्त सरपंच सौ पद्मजा कृष्णात करपे यांच्या हस्ते करण्यात आले या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त ग्रामस्थांनी घ्यावा आणि आपलं आरोग्य चांगलं राखायचं आहे.

 

 

असे आवाहन सरपंच या वेळी उपस्थित यांना केले यावेळी माजी उपसरपंच कृष्णात करपे माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कौनदाडे सर्व ग्रामपंचायत सदस्य सदस्या ग्रामपंचायत प्रतिनिधी अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर डॉक्टर
उपस्थित होते