क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथे महिला सन्मान मेळावा 

कोल्हापूर – क्रांतीसिंह नाना पाटील नगर येथे श्री महालक्ष्मी ग्रुप रेणुका भक्त मंडळ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या महिला सन्मान मेळाव्यामध्ये उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना करवीर पोलीस स्टेशनचे एपीआय माननीय बाबासाहेब सरवदे साहेब म्हणाले सर्वसामान्य कष्टकरी विधवा महिलांचा सन्मान होत असलेला पाहून अतिशय समाधान वाटले.

 

 

 

 

तळागाळातील सामान्य विधवा महिलांना सन्मानित करणे हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. याबद्दल संयोजकांचे अभिनंदन.
मान्यवरांचे व उपस्थितांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक श्री गजानन विभुते यांनी केले.
कार्यक्रमाचे संयोजन श्री महालक्ष्मी ग्रुपच्या प्रमुख शोभा विभूते यांनी केले.कोल्हापूर महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुदर्शन पाटील यांनी उपस्थित महिलांना आपल्या आरोग्य विषयी काळजी घेण्याचा सल्ला दिला. कॉम्रेड सुभाष शेटे श्री चंद्रकांत बागडी हे मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात सुजाता कोल्हापुरे, मनीषा पलंगे, विद्या वीर, म्हेतर मावशी, चुडेकर मावशी या पाच कष्टकरी विधवा महिलांचा मान्यवरांच्या हस्ते शाल व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी फनी गेम्स स्पर्धेमध्ये विजेत्या स्पर्धक अनुक्रमे दिपाली पाटील, स्मितल सुतार, रोहिणी लोखंडे, आदिती पलंगे, प्रतिमा जाणवेकर. तसेच उत्तेजनार्थ दिपाली पाटील, तृप्ती टिपूगडे, मनीषा जाधव, मीनाक्षी जाधव, सपना पोरलेकर या महिलांना व लकी ड्रॉ मध्ये सुशीला शेळके व वर्षा माळकर या महिलांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले,

यावेळी प्रशांत विभुते, माधुरी विभुते,गणपत बारड व रेखा बारड यांनी परिश्रम घेतले.
यावेळी करवीर पोलीस हवालदार सुहास पवार, सुशांत विभुते, प्रकाश जोशी, चंद्रकांत पोरलेकर, रूपाली ओतारी, गीता तेली, प्रतिमा जाणवेकर, स्नेहल तेली, कांचन कांबळे, मनीषा मांगले, यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.