श्रीपतराव चौगुले काॅलेजच्या भक्ती पाटील हिला शिवाजी विद्यापीठाची आठ पारितोषिके

पन्हाळा – श्रीपतराव चौगुले काॅलेजच्या भक्ती पाटील हिला शिवाजी विद्यापीठाची आठ पारितोषिके मिळाली.श्रीपतराव चौगुले आर्ट्स अॅण्ड सायन्स कॉलेज,माळवाडी-कोतोली येथील मराठी विभागातील एम.ए. ची विद्यार्थिनी भक्ती जगन्नाथ पाटील हिला शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर येथे एम.ए.मध्ये शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रामध्ये सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल प्रा.जी.एम.पवार,माधव ज्युलियन,प्रा.रामचंद्र कृष्णाजी पानसे बार्शी स्मृती,कै.श्रीमती जयश्री गुरुराज,गुरुवर्य कै.डॉ.विष्णू नारायण कुलकर्णी भाषा भूषण, उमा गिरीश,मराठी कथा लेखक दिनकर डी.भोसले तथा चारुता सागर व वेणूताई चव्हाण स्मृती अशी आठ पारितोषिके व रोख रक्कम प्रदान करण्यात आली.

 

 

 

यासाठी तिला ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष डॉ.के.एस.चौगुले संस्था सचिव शिवाजीराव पाटील,प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील,अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक प्रोफेसर डॉ.बी.एन.रावण, ऍक्टिव्हिटी प्रमुख डॉ.एस.एस. कुरलीकर,मराठी विभाग प्रमुख प्रा. ए.आर.महाजन,प्रा.एम.वाय.पोवार, सर्व शिक्षक,कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.