कुंभोज प्रतिनिधी( विनोद शिंगे)
कुंभोज तालुका हातकणंगले येथील अनिल लक्ष्मण लोहार यांनी आपला परंपरागत लोहार व्यवसाय पुन्हा एकदा जोमाने सुरू केला असून त्यांनी तयार केलेल्या शेती उपयोगी व अन्य साहित्याला कुंभोज सह परिसरातून मोठी मागणी होत आहे.
अनेक विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणानंतर वेग वेगळे व्यवसाय निवडले कोणी नोकरी तर कोणी अन्य व्यवसाय परंतु अनिलने मात्र आपल्या घराण्याचा असणारा परंपरागत व्यवसाय करण्याचा निर्धार केला त्यासाठी त्याला त्याचे आई-वडील व घरच्यांची साथ मिळाली आज अनिलने कुंभोज दानोळी रोडवर असणारे आपल्या शेतामध्ये मोठे शेड मारून त्यामध्ये आपल्या लोहार कामाचा व्यवसाय चालू केला आहे.
अनिलने तयार केलेल्या खुरपे विळे वअन्य हत्यारांना कुंभोज परिसरातून मोठी मागणी असून त्याच्या या व्यवसायाकडे अनेक लोकांचे लक्ष केंद्रित केले जात आहे. परिणामी परंपरेने चालत आलेले व्यवसाय आपणच नाही केले तर ते व्यवसाय करणार कोण ?काही वेळा बरेच व्यवसाय बंद पडल्याने अनेक अडचणी येऊ शकतात त्यासाठी विद्यार्थ्यांनी परंपरेने चालत आलेले व्यवसाय सुरू ठेवावेत असे मत अनिल लोहार यांनी बोलताना व्यक्त केले.