राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान

मुंबई : भारताच्या राष्ट्रपती . श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आले. विविध पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या महाराष्ट्राच्या क्रीडारत्नांचे अभिनंदन सर्व स्तरातून होत आहे.

 

 

 

 

जलतरणपटू मुरलीकांत राजाराम पेटकर यांना अर्जुन पुरस्कार (जीवनगौरव), नेमबाजी प्रशिक्षक श्रीमती दीपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्कार तसेच त्यांचे शिष्य नेमबाज, ऑलिम्पिक पदकपटू स्वप्नील कुसळे याला अर्जुन पुरस्कार, गोळाफेकपटू सचिन सर्जेराव खिलारी यांना अर्जुन पुरस्कार (पॅरा-ॲथलेटिक्स) प्रदान करण्यात आले. उल्लेखनीय कामगिरीमुळे क्रीडाक्षेत्रात महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे.