आ. चंद्रदीप नरकेंच्या हस्ते भव्य कुस्ती स्पर्धेचे उदघाटन

कोल्हापूर : कुंभी-कासारी सह. साखर कारखाना आयोजित 33 वी मानधनधारक मॅट वरील भव्य कुस्ती स्पर्धेच्या उदघाटन समारंभास आमदार चंद्रदीप नरके उपस्थित राहिले .

 

 

राजर्षी शाहू महाराजांनी कुस्तीला राजश्रय देऊन प्रोत्साहन दिले. त्यांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचे काम कुंभी कारखान्यामार्फत गेली अनेक वर्ष केले जात आहे. यावेळी कारखान्याचे सर्व संचालक, कर्मचारी बंधू यांच्यासह कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.