कुंभोज (विनोद शिंगे )
बाहुबली तालुका हातकणंगले येथील बाहुबली विद्यापीठ संचलित बालविकास मंदिर बाहुबली यांची लहान चिमूंची शैक्षणिक सहल आज एक दिवसाच्या दौऱ्यासाठी सांगली जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी पहाटे पाच वाजता रवाना झाली, सरकारी नियमाप्रमाणे व शाळेच्या धोरणाप्रमाणे विद्यार्थ्यांना पुस्तके ज्ञानाबरोबरच बाहेरची जनरल नॉलेज असणे गरजेचे आहे.
या उद्देशाने विद्यार्थ्यांना सांगली जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळे ,साखर कारखाने, पर्यटन स्थळे व धार्मिक स्थळे दाखवण्यासाठी आज जवळजवळ 200 विद्यार्थी एसटी महामंडळाच्या लालपरीतून सहलीसाठी रवाना झाले .परिणामी पहाटेपासूनच विद्यार्थ्यांनी आपापल्या पालकांच्या समोर केलेला हट्ट पहाटे तीन वाजल्यापासून सहलीची जाण्यासाठी तयारी शाळेत मध्ये जायची तयारी व शाळेत लालपरी मध्ये बसल्यानंतर सहलीला जाण्याचा आनंद व पालकांना देण्यात येणारा निरोप हे सर्व पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पालक वर्ग उपस्थित होता दोनशे विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी जवळजवळ 500 पेक्षा जास्त पालक आज विद्यालयाच्या पटांगणात उपस्थित होते.
या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर असणारा आनंद पाहण्याजोगा होता. यावेळी अनेक पालकांना आपली लहानपण आठवले.