कुंभोज (विनोद शिंगे )
कुंभोज (ता.हातकणगले) येथील रयत शिक्षण संस्था संचलित रयत पब्लिक स्कूल चा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सदर कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या कलागुणांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते. काही वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या रयत पब्लिक स्कूलने आज पहिलीपासून दहावीपर्यंतचे उत्तम भरारी मारली असून कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आचार विचाराप्रमाणे सदर शिक्षण संस्थेत शिक्षण देण्याचे काम सुरू आहे.
परिणामी सध्या शिक्षण संस्थेमध्ये एमपीएससी यूपीसी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या साठी अध्ययन केंद्र सुरू करण्यात आले असून, सदर रयत पब्लिक स्कूलचे प्राचार्य सागर माने यांचे यामध्ये मोलाचे योगदान असल्याचे चित्र दिसत आहे.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन कुंभोज गावच्या सरपंच सौ स्मिता चौगुले तसेच शरद सहकारी साखर कारखान्याचे संचालक आप्पासाहेब चौगुले तसेच गुरुकुलातील सर्व संचालक पदाधिकारी व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या कलागुणांना कुंभोजस परिसरातील आलेल्या हजारो नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला यावेळी पत्रकार दिनाचे औचित्य साधून कुंभोज सह परिसरातील सर्वच पत्रकारांचा सत्कार रयत शिक्षण संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या वतीने करण्यात आला.
यावेळी रयत मॅनेजिंग कौन्सिलचे मेंबर अजित पाटील, केदार कुंभोजकर,सौ दिपीका कुंभोजकर, छत्रपती राजाराम साखर कारखाना संचालक अमित साजनकर,व्हि जे पाटील,सुशांत पाटील,धनंजय शेटे,प्रयवेशिका संगिता चदोबा, प्रियांका वाघमोडे,मनिषा भंडारी, डान्स टीचर फिरोज मुल्ला उपस्थित होते .यावेळी जन्म बाईचा हे गाणे सादर करणाऱ्या रिया कोल्हे,समिशा वळीवडे विद्यार्थिनींचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला त्यांनी सादर केलेल्या जन्म बाईचा या गाण्याने उपस्थित अनेक महिलांच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहु लागल्या होत्या. कार्यक्रमाचे स्वागत प्राचार्य सागर माने यांनी केले.