गडहिंग्लज येथील कार्यकर्त्यांचे समरजीत घाटगे गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर पक्षप्रवेश

कोल्हापूर : गडहिंग्लज शहरातील युवा कार्यकर्ते सचिन खणगावे, अमित बुगडे, साहिल भाई, साहिल सय्यद, दयानंद दावणे, नारायण दळवी बड्याचीवाडी यांनी समरजीत घाटगे गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.

 

 

पक्षप्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मंत्री श्री मुश्रीफ यांनी स्वागत केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने, गडहिंग्लजचे माजी नगराध्यक्ष राजू खणगावे, माजी उपनगराध्यक्ष नरेंद्र भद्रापूर, उदय पाटील, करंबळीचे लोकनियुक्त सरपंच अनुप पाटील, ॲड. सतीश येरटी, विनोद बिलावर, विनोद लाखे, सुनील कलाल, ताहीर पुसरगे, दयानंद पाटील, अभिषेक पाटील, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.