केंद्र शासनाच्या वतीने पुरस्कार घोषित झालेल्या मान्यवरांचा मंत्रालयात सत्कार

मुंबई:केंद्र शासनाच्या वतीने मानाचे पुरस्कार घोषित, राष्ट्रसेवेसाठी स्वतःला समर्पित केलेल्या आणि देशाच्या स्वाभिमानात भर घालणाऱ्या मान्यवरांचा मंत्रालयात गौरवपूर्ण सत्कार केला.

 

२०२४-२५ या वर्षासाठी ‘जीवन गौरव पुरस्कार’ घोषित पद्मश्री श्री. मुरलीधर राजाराम पेटकर (सुभेदार), ‘द्रोणाचार्य पुरस्कार’ घोषित प्रशिक्षक श्रीमती दीपाली देशपांडे आणि ‘अर्जुन पुरस्कार’ घोषित आंतरराष्ट्रीय खेळाडू स्वप्निल कुसाळे व सचिन खिलारी यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे महासचिव नामदेव शिरगावकर हे देखील उपस्थित होते.