कोल्हापूर – करवीर तालुक्यातील बालिंगा येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राखी अजय भवड यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच सुधा वाडकर यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते.नुतन सरपंच यांच्या सह पदाधिकारी यांचा सत्कार आज आमदार सतेज पाटील, श्रीपतराव दादा बोंद्रे बॅकेचे अध्यक्ष राहुल पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी उपसरपंच पौर्णिमा जत्राटे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुधा वाडकर, सचिन माळी,
मयूर जांभळे, संदीप सुतार, नंदकुमार जांभळे, पंकज कांबळे, पूजा जांभळे, धनंजय ढेंगे, सुनीता जांभळे, वैशाली कांबळे, विद्या माळी अजय भावड,राजू चौगुले, अनिल पवार, रघुनाथ वाडकर, प्रकाश माळी, विनायक कांबळे, जयसिंग संकपाळ, नंदकुमार जांभळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. ग्रामविकास अधिकारी रमेश कारंडे यांनी नूतन सरपंचांचे स्वागत केले तर तलाठी संदीप हजारे यांनी आभार मानले.