पुणे : वैद्यकीय मंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रादेशिक मनोरुग्णालय, येरवडा, पुणे येथे भेट देत संपूर्ण परिसराची पाहणी केली. महिला व पुरुष वार्ड, आहार कक्ष, पुनर्वसनात्मक सेवा विभागाला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील रुग्णांशी संवाद साधला.
यावेळी रुग्णालयाच्या वतीने विविध विभागांमार्फत देण्यात येणाऱ्या सेवांविषयी सादरीकरण करण्यात आले. प्रादेशिक रुग्णालय बंगलोरच्या निम्हांस रुग्णालयाच्या धर्तीवर हे रुग्णालय कसे साकारले जाणार आहे, याविषयीचे सादरीकरण बांधकाम विभाग यांनी केले. प्रादेशिक मनोरुग्णालय आदर्श कसे करता येईल याविषयी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
यावेळी डॉ. नितीन अंबाडेकर, संचालक, मुंबई, डॉ. विजय बाविस्कर, अतिरिक्त संचालक, डॉ. बबिता कमलापूरकर सहसंचालक, आरोग्य सेवा (हिवताप हत्तीरोग व जलजन्य रोग) डॉ. संदीप सांगळे सहसंचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग व क्षयरोग) डॉ. कैलास बाविस्कर उपसंचालक, आरोग्य सेवा, राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग, पुणे, डॉ. राजरत्न वाघमारे, उपसंचालक, आरोग्य सेवा (आमाजिआ), श्री. वैजनाथ गलांडे उपसंचालक, आरोग्य सेवा (परिवहन) पुणे, श्री. विनोद फाले उपसंचालक, आरोग्य सेवा (राज्य आरोग्य प्रयोगशाळा, पुणे), डॉ. राधाकिसन पवार, उपसंचालक, आरोग्य सेवा (पुणे मंडळ, पुणे) डॉ. रेखा गायकवाड उपसंचालक, आरोग्य सेवा (कुटुंब कल्याण), डॉ. संजयकुमार जठार, सहायक संचालक, आरोग्य सेवा, राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग, पुणे, डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा शल्यचिकित्सक, पुणे, डॉ. सचिन देसाई, जिल्हा आरोग्य अधिकारी, पुणे, डॉ. प्रेमचंद कांबळे सहायक संचालक, हत्तीरोग उपस्थित होते.