स्वप्नील कुसाळेला अर्जुन पुरस्कार जाहीर

मुंबई : सरकारकडून राष्ट्रीय खेळ पुरस्कारांची घोषणा गुरुवार (2 जानेवारी) रोजी करण्यात आलेली आहे.यात 2024 मध्ये खेळरत्न, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार इत्यादींनी गौरवण्यात येणाऱ्या खेळाडूंची नावं समोर आली आहेत.

 

 

यंदा खेळरत्न पुरस्कार 4 खेळाडूंना मिळाला असून, अर्जुन अवॉर्ड यंदा 32 खेळाडूंना जाहीर करण्यात आलेला आहे. यात महाराष्ट्राचा स्वप्नील कुसाळे याला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्वप्नील कुसाळे याने 2024 मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजीत भारताला कांस्य पदक जिंकवून दिले होते. तर स्वप्नील सह त्याची प्रशिक्षक दिपाली देशपांडे हिला देखील द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

🤙 9921334545