खा. धैर्यशील मानेंच्या उपस्थितीत कोल्हापुरात  मोफत महाआरोग्य तपासणी

कोल्हापूर : रोटरी ग्रामसेवा मल्टीपर्पज को ऑफ क्रेडिट सोसायटी, कोल्हापूर यांच्या पहिला वर्धापन दिनानिमित्त मोफत महाआरोग्य तपासणी रक्तदान शिबिर, दिव्यांग मदत साहित्य प्रधान आणि मोबाईल ॲप अनावरण समारंभाचे आज आयोजन करण्यात आले होते.

 

समाजातील सर्व घटकांचे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक आरोग्य सुदृढ करण्याच्या प्रयत्न रोटरी ग्रामसेवक केंद्र करत आहे. या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून खासदार धैर्यशील माने उपस्थित राहिले.

यावेळी दिव्यराज वसा (प्रेसिडेंट रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज) श्री योगेश रास्ते (सेक्रेटरी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज) ईश्वरा पाटील, जयदीप पाटील, विशाल जाधव, सतीश जाधव, ॲड. शाहू काटकर, ओजस हंचनाळे, प्रवीण पाटील, श्यामप्रसाद पावसे, सचिन पाटील, प्रकाश सूर्यवंशी, दीप्ती ताई कोळेकर आदी उपस्थित होते.
.