क्षयरोग निर्मूलन मोहिमेअंतर्गत गांधीनगर येथे आ.अमल महाडिकांच्या हस्ते पोषण आहाराच्या किटचे वाटप

कोल्हापूर : क्षयरोग निर्मूलन मोहिमेअंतर्गत गांधीनगर इथल्या उपजिल्हा रुग्णालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात क्षयरोगग्रस्त रुग्णांना आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते पोषण आहाराच्या किटचे वाटप करण्यात आले.

 

तसेच क्षयरोगावर यशस्वीरित्या मात केलेल्या व्यक्तींचा सत्कारही करण्यात आला. क्षयरोग निर्मूलनासाठी मदत करणाऱ्या खाजगी डॉक्टरांचा सत्कारही या निमित्ताने करण्यात आला. यावेळी क्षयरोग मुक्त भारताची शपथ घेण्यात आली. शंभर दिवसीय क्षयरोग निर्मूलन मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन याप्रसंगी केले.

या कार्यक्रमाला आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.हर्षला वेदक यांच्यासह वैद्यकीय अधिकारी कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.