कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत आंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेत मुलांमध्ये मेडिकल कॉलेजचा प्रथम कोटीन्हा तर मुलींमध्ये स्कूल ऑफ हॉस्पिटलीटीची विद्यार्थिनी श्रेया दाइंगडे यांनी प्रथम क्रमांक मिळवला.
डी. वाय. पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कदमवाडी येथे झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन कुलगुरू डॉ राकेश कुमार मुदगल यांच्या हस्ते झाले. यावेळी विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. अद्वैत राठोड, स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे संचालक डॉ. अजित पाटील, क्रीडा संचालक शंकर गोनुगडे, सुशांत कायपुरे, प्रा. निखिल नायकवडी, डॉ. रोहित लांडगे, डॉ. वेदांत पाटील आदी उपस्थित होते.
मुलांच्या गटामध्ये स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंटच्या राजवर्धन उंडाळे याने तर मुलींमध्ये याच महाविद्यालयाच्या श्रेया शेट्टी हिने द्वितीय क्रमांक मिळवला.
कुलपती डॉ. संजय डी पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त मा. आ. ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलसचिव डॉ. विश्वनाथ भोसले यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले.