‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह’ प्रकरणाची सुनावणी 17 डिसेंबरला होण्याची शक्यता !

मुंबई : राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुनावणी आता 17 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वेळापत्रकात ही संभाव्य तारीख नमूद करण्यात आली आहे.

 

 

राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार गट शरद पवारांचा फोटो वापरत आहे, असा अर्ज शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला होता. अजित पवारांनाही वेगळे चिन्ह द्यावे अशी मागणी शरद पवार गटाने केली होती. यावर अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे काटेकोर पालन करावे असे आदेश दिले होते. त्यानंतर ही सुनावणी होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि घड्याळ हे पक्षाचे चिन्ह अजित पवार यांना देण्यात आले होते . या निर्णयाविरुद्ध शरद पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.