मुंबई : गुरुवारी महायुती सरकारचा शपथविधी झाला. याबद्दल सुप्रिया सुळे म्हणाले, म्हणाले की पुढची पाच वर्ष त्यांनी राज्याची सेवा करावी महाराष्ट्राचा हक्क दुसऱ्या राज्याला देऊ नये, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला.
खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या, लाडकी बहीण योजनेची 2100 रुपये सुरू करणार आहे शक्य असेल तर एक जानेवारी 2000 पासून ती सुरू करावी. आमची अपेक्षा 3000 द्यावेत अशी आहे. विरोधकांची सशक्त लोकशाहीमध्ये गरज असते. आम्ही देशाच्या हितासाठी सहकार्य करत असतो. व्यक्तीसाठी आम्ही सहकार्य करत नाही .
महाराष्ट्र विधानसभेचा निकाल आम्ही शंभर टक्के मान्य करत नाही. या निकालाविरुद्ध निवडणूक आयोगात आम्ही गेलो आहोत. माजी आमदार संग्राम थोपटे यांना भोर मतदार संघातील एका बूथवर एक मत मिळाला, हे अशक्य आहे.