आ. हसन मुश्रीफांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त केले अभिवादन

कागल: भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त आमदार हसन मुश्रीफ यांनी अभिवादन केले. गैबी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासह महात्मा ज्योतिबा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महामानवांच्या पुतळ्यानाही पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

 

 

समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघर्ष करा व शहाणे व्हा, असा क्रांतिकारी मंत्र दिला. विषमतेने बजबजलेल्या समाजात समता आणि बंधुता नांदावी, या भावनेतून त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांनी दिलेल्या समता, बंधुता आणि न्याय या त्रिसूत्रीवर वाटचाल करण्यातच मानवजातीचे कल्याण आहे.

यावेळी माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, जेष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी, प्रवीण काळबर, अजित कांबळे, सौरभ पाटील, संजय ठाणेकर, भगवान कांबळे, गणेश कांबळे, सुरेश कामत, प्रकाश कांबळे, रमेश घस्ते, सुधाकर सोनुले, गणेश सोनुले, संजय चितारी, विवेक लोटे, तुषार भास्कर, बच्चन कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

🤙 9921334545