कोल्हापूर: सावर्डे ( ता. हातकणंगले) येथील रणजित बाळासाहेब पाटील ( वय ३५) या तरुणाने स्वतःच्या वाढदिवसदिवशीच गळफास घेऊन आत्महत्या केली.
रणजित हे गोकुळ दूध संघामध्ये सुपरवायझर म्हणून काम करत होते. ३ डिसेंबर रोजी त्यांचा वाढदिवस होता , त्यानिमित्त त्यांना मित्र परिवाराकडून शुभेच्छा दिल्या जात होत्या ,मात्र कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती, सायंकाळी सावर्डेतील खडीचा माळ येथे झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या कोणत्या कारणातून केली याचे कारण अद्याप समजले नाही.
आत्महत्या करण्यामुळे लिहलेल्या चिट्ठीत माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये ,कुटुंबातील सगळ्यांची माफी मागून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख चिट्ठीत आढळला आहे. या घटनेची नोंद पेठवडगाव पोलीस ठाण्यात झाली आहे.