मांडरेतील चौघांना विषबाधा ; तिघांचा मृत्यू ,एक अत्यवस्थ

कोल्हापूर : मांडरे (ता.करवीर) येथील पाटील कुटुंबातील चौघाना विषबाधा झाली. यामध्ये पांडुरंग पाटील (वय 65) यांचा आठवड्यापूर्वी मृत्यू झाला . त्यानंतर मंगळवारी सायंकाळी दोन भावंडांना आपला जीव गमवावा लागला. तर तिसऱ्या भावाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.नक्की विषबाधा झाली आहे की घातपात यामागचे कारण अद्यापही समजलेले नाही.

 

 

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पाटील कुटुंबातील चौघांची तब्येत अचानक बिघडली. त्यांनी गावातच तीन दिवस उपचार घेतले होते, सीपीआर मध्ये उपचार सुरू केले , परंतु प्रकृतीत सुधारणा न झाल्यामुळे त्यांना खाजगी रुग्णालय दाखल करण्यात आले. यामध्ये पांडुरंग पाटील यांचा आठवड्यापूर्वी निधन झाले . त्यानंतर मंगळवारी सायंकाळी त्यांची मुले कृष्णात पांडुरंग पाटील (वय 35) प्रदीप पांडुरंग पाटील (वय 32)या दोन मुलांचाही मृत्यू झाला. तर रोहित पांडुरंग पाटील (वय 30)या तिसऱ्या मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे संपूर्ण मांडरे गावावर शोककळा पसरली आहे .

अन्नातून विषबाधा झाल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे . सीपीआर येथे शवविच्छेदनानंतर नातेवाईकांनी या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी ,अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्र घेतला. करवीरचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी भेट देऊन रिपोर्ट येतात कारवाई करू, असे सांगितले त्यानंतर मृतदेह नातेवाईकाकडे देण्यात आला. याच कुटुंबातील सौ. गंगा कृष्णात पाटील (वय 25)व कुमारी ओवी कृष्णात पाटील (वय3) यांना मात्र कोणताही त्रास झालेला नाही.

🤙 9921334545