महायुतीच्या संभाव्य मंत्र्यांच्या यादीत मुश्रीफ व क्षीरसागर

कोल्हापूर: महायुतीच्या भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी संभाव्य मंत्र्यांची पहिली यादी तयार केली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील पालकमंत्री हसन मुश्रीफ व शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर यांचे नाव असल्याचे समजते.

 

कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीतील शिवसेना शिंदे गटाचे चार आमदार निवडून आले आहेत तर भाजपचे दोन आमदार निवडून आले असून अपक्ष विजयी उमेदवाराने पाठिंबा दिल्यामुळे त्यांची संख्या तीन आहे. जनसुराज्य शक्ती पक्षाचे दोन आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची एक आमदार निवडून आला आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाने केलेल्या मंत्र्यांच्या यादीत कोल्हापुरातून आमदार राजेश क्षीरसागर यांचे नाव असल्याची समजते तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून कागल मतदार संघातून हसन मुश्रीफ हे आमदार निवडून आले आहेत. पक्षांमध्ये ते ज्येष्ठ आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने केलेल्या संभाव्य मंत्री पदाच्या पहिल्या यादीत हसन मुश्रीफ यांचे नाव असल्याची समजते.