कुंभोज (विनोद शिंगे)
नुकत्या संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीची चर्चा सध्या रंगत असताना कोण उमेदवार किती मताने आला व कोण उमेदवार किती मतांनी पडला, कोणाला कोणत्या भागात का मते पडली व का कमी पडली याची चर्चा आता कमी झाली असून सध्या कोणत्या पक्षाकडून किती पैसे आले व कोणत्या पक्षाने किती पैसे मतदारांना दिले याची चर्चा सध्या चौकात चौकात रंग भरत असून सर्वसामान्य मतदार आलेल्या पैशाची आकडेमोड करून इतर लोकांना पटवून सांगण्यात व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहे.
ग्रामीण भागातील स्वयंघोषित व नावाजलेले नेते मात्र आपापले मोबाईल बंद करून आपण इतर कामात व्यस्त असल्याचे भास होत आहेत. हातकणंगले विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात तिरंगी लढत लागली होती. यामध्ये भाजप जनसराज काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटना या तिन्ही उमेदवारांमध्ये अटीतटीची लढत होती परंतु शेवटच्या घटकेत भाजप जणूसराज्य पक्ष व काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक योजना अमलात आणल्या गेल्या त्यामध्ये दररोज मतदारांना भोजनावळीही सुरू होत्या, परिणामी शेवटच्या टप्प्यात मतदारांना मताचा दरहि निघाल्याची चर्चा ग्रामीण भागात जोरात सुरू झाली, त्यासाठी ज्या त्या भागातील गटनेत्यांना मताप्रमाणे उमेदवारांनी पैसे पोहोच केल्याची ही चर्चा रंगत होती. चर्चा रंगत असतानाच बरेच ठिकाणी ही चर्चा प्रत्यक्षात अंमलात आल्याचे चित्रही दिसत होते. परंतु ज्या ठिकाणीही चर्चा केवळ चर्चाच राहिली अशा मतदारांनी मात्र आपली मतदान फुकट गेल का? नेत्यांनी आपला वापर केला का? काही ठिकाणी मतदारांना पैसे दिले व आपल्याला का दिले नाहीत यावर चौकात चौकात सध्या चर्चा रंगत असून उमेदवाराने वरून पैसे दीले किती व ग्रामीण भागातील नेत्यांनी खाली ते वाटले किती? यावर सध्या चर्चा रंगत असून. उमेदवार व नेत्यांच्या बगलबच्च्यांनी मतदारांची केलेली अवस्थेवर मत व्यक्त करण्यात सध्या कट्ट्यावरील मतदार व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहे.
परिणामी ग्रामीण भागात मतासाठी मोठ्या प्रमाणात आकडेवारी मोजली असल्याचे मत ही काही जाणकार राजकीय मंडळींच्याकडून व्यक्त होत असले तरीही सदर आकडेवारी प्रत्यक्ष मतदारांच्या पर्यंत पोहोचली का हेही पाहणे गरजेचे आहे. परिणामी मतदाराच्या नावावर अनेक वेळा अनेक ठिकाणी पैशाचा गैरवापर केला जातो. त्यामुळे मतदार राजा न काही घेता बदनाम झाला असून घेणारे घेत जातात परंतु सर्व सामान्य मतदार त्यापासून वंचितच राहतात अशी अवस्था ग्रामीण भागात झाली असून निवडणुकीत मतासाठी किती पैसे आले कोणी कोणाला किती पैसे दिले व कोणाला दिले नाहीत तसेच निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार ला किती खर्च आला असावा यावर सध्या चौकाचौकात चर्चा रंगत असून अद्यापही ग्रामीण भागात गटनेत्यांच्याकडे अनेक मतदार आपले उधारीचे येणे वसूल करण्यासाठी दररोज हेलपाटे मारत असल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी चहा पेक्षा किटल्या गरम असणारे उमेदवार व गटनेत्यांचे कार्यकर्ते मात्र सदर मतदारांना उडवाळूची उत्तरे देऊन त्यांना त्यांची जागा दाखवत आहेत परिणामी चौकात चौकात आसणाऱ्या निवडणुकीच्या खेळ खंडोबाच्या चर्चा ऐकण्यासाठी मात्र थंडीच्या दिवसात मोठ्या प्रमाणात मतदार एकत्र गोळा होऊन ग्रामीण भागाबरोबरच राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार कोणता नेता काय करणार या चर्चेकडे सर्वांचे लक्ष वेधत आहेत.