कुंभोज :कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीने 10 पैकी 10 जागा जिंकून इतिहास घडविला आहे. या ऐतिहासिक विजयानंतर सर्व नवनिर्वाचित आमदारांन सोबत आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांनी राज्याच्या प्रमुख नेत्यांची मुंबईत भेट घेतली.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अभूतपूर्व यशाबद्दल महायुतीचे नेते व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,भाजपा नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , भाजपा प्रदेशाध्यक्ष व नूतन आमदार चंद्रशेखर बावनकुळे , माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांचे यावेळी अभिनंदन केले.
यावेळी खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार . संजय मंडलिक,आमदार . राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार अमल महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, आमदार शिवाजी पाटील, कृष्णराज महाडिक उपस्थित होते.