कोल्हापूर : मेंगलोर विद्यापीठ यांच्यामार्फत आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ क्रॉस कंट्री पुरुष स्पर्धेमध्ये संपूर्ण देशभरातून 247 विद्यापीठांचे पुरुष संघ सहभागी झालेले होते. शिवाजी विद्यापीठाच्या पुरुष संघाने उल्लेखनीय कामगिरी करत श्री प्रधान किरूळकर याने वैयक्तिक द्वितीय क्रमांक व श्री अभिषेक देवकाते याने वैयक्तिक तृतीय क्रमांक पटकाविला व शिवाजी विद्यापीठाच्या पुरुष संघाने 89 गुणांची कमाई करत सांघिक चतुर्थ क्रमांक मिळविला.
संघातील खेळाडू खालील प्रमाणे
1. प्रधान किरूळकर,
2. अभिषेक देवकाते,
3. प्रवीण कांबळे,
4. उत्तम पाटील,
5. अंकुश हाक्के,
6. राहुल चव्हाण
1. प्रधान किरूळकर,
2. अभिषेक देवकाते,
3. प्रवीण कांबळे,
4. उत्तम पाटील,
5. अंकुश हाक्के,
6. राहुल चव्हाण
तसेच महिला स्पर्धेमध्ये देशभरातून 107 विद्यापीठांचे महिला संघ सहभागी झाले होते. शिवाजी विद्यापीठाच्या महिला संघाने या स्पर्धेवर आपले वर्चस्व ठेवले. सृष्टी रेडेकर हिने वैयक्तिक पाचवा क्रमांक तर महिलांच्या संघाने 64 गुणांसह सांघिक तृतीय क्रमांक पटकाविला.
संघातील खेळाडू खालील प्रमाणे
1. सृष्टी रेडेकर,
2. वैष्णवी मोरे,
3. वैष्णवी रावळ,
4. गायत्री पाटील,
5. वैष्णवी सावंत,
6. सानिका नलवडे
संघातील खेळाडू खालील प्रमाणे
1. सृष्टी रेडेकर,
2. वैष्णवी मोरे,
3. वैष्णवी रावळ,
4. गायत्री पाटील,
5. वैष्णवी सावंत,
6. सानिका नलवडे
विजयी संघाचे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कुलगुरू यांनी खेळाडूंना आपल्या सरावा मधे सातत्य , नियोजनबद्धता आणि शिस्त ठेवण्याचे , आणि येणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ एथलेटिक्स चॅम्पियनशिप साठी तयारी करणे असे मार्गदर्शन केले. शिवाजी विद्यापीठाचा क्रॉस कंट्री मधे आपला दबदबा कायम ठेवल्या बद्दल खेळाडू आणि प्रशिक्षक यांचे कौतुक केले. या वेळी प्रकुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. एस. व्ही. बनसोडे,
प्रशिक्षक प्रा. रामा पाटील, प्रशिक्षक प्रा. प्रकुल पाटील मांगोरे व संघ व्यवस्थापक डॉ. सविता भोसले , प्रा. सुचय खोपडे हे उपस्थित होते.
प्रशिक्षक प्रा. रामा पाटील, प्रशिक्षक प्रा. प्रकुल पाटील मांगोरे व संघ व्यवस्थापक डॉ. सविता भोसले , प्रा. सुचय खोपडे हे उपस्थित होते.