कोल्हापूर : लोकशाहीच्या महापर्वाचा म्हणजेच मतदानाचा दिवस.सकाळी मतदान करून शहरातील विविध मतदान केंद्राला आमदार सतेज पाटील यांनी भेटी दिल्या. यावेळी सतेज पाटील म्हणाले, सकाळपासूनच मतदान केंद्रांवर गर्दी दिसत होती. नागरिकांचा उत्साह तर अंगावर रोमांच आणणारा आहे. वयोवृद्ध असो की तरुण, प्रत्येकाला लोकशाहीच्या या पवित्र सोहळ्यात आपली भूमिका बजावल्याचा अभिमान वाटत होता.

यात सर्वाधिक उठून दिसला तो नवमतदारांचा आनंद! त्यांनी या सोहळ्याला वेगळ्याच उंचीवर नेलं आहे. पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावून त्यांचा आत्मविश्वास दुणावलेला दिसत होता.
आजचा दिवस लोकशाहीच्या बळकटीचा साक्षीदार असून जनतेच्या या उत्साहाने आणि नवमतदारांच्या जोशाने देशातील लोकशाही अधिक मजबूत होईल, याबद्दल शंका नाही. मतदान म्हणजे आपला हक्क, संविधानाप्रती कर्तव्य आणि भविष्य सुरक्षित करण्याचे साधन आहे. त्यामुळे चला मतदान करूया… लोकशाहीला बळकट करूया.
