विविध संकल्पनावर आधारित जिल्ह्यात 143 थिमॅटिक मतदान केंद्र

कोल्हापूर: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून त्यासाठी मतदान केंद्र निर्मितीची प्रक्रिया सुरु झाली आहे. जिल्ह्यामध्ये एकूण 10 मतदारसंघात मतदान टक्केवारी वाढीसाठी विविध संकल्पना घेवून 143 थिमॅटिक मतदान केंद्रांची निर्मिती नियंत्रण अधिकारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या नियंत्रणात करण्यात येत आहे.

 

 

 

 

 

जिल्ह्यातील 10 मतदारसंघात मतदारसंघ व तालुकानिहाय थिमॅटिक मतदान केंद्रांची यादी पुढीलप्रमाणे आहे.
271 चंदगड विधानसभा मतदारसंघ 15 थिमॅटिक मतदान केंद्र उभारण्यात येत आहेत
चंदगड तालुक्यातील गाव व थीम पुढीलप्रमाणे –1. झांबरे– जलसमृध्द गाव, 2. तडशिनहाळ – पायाभूत सुविधायुक्त गाव, 3. हाजगोळी – बालस्नेही गाव, 4. गुडवळे खालसा – बांबू लागवड, 5. तिलारी नगर – स्वच्छ व हरित गाव, 6. बसर्गे – रेशीम लागवड, 7. सुंडी – वुमन फ्रेंडली व्हिलेज.
गडहिंग्लज तालुक्यातील गाव व थीम पुढीलप्रमाणे – 1. कौलगे 351– विविधतेने नटलेला भारत, 2. हिटणी 68 – हवामान बदल- जागतिक समस्या , 3. बडयाची वाडी 302- ग्रीन व्हिलेज, 4. हलकर्णी- 172 – जलसंवर्धन, 5. हरळी खुर्द – 140- जैव विविधता संवर्धन- काळाची गरज, 6. नूल 97- संगणक, टी.व्ही., मोबाईल- अतिवापराचे दूष्परिणाम.
आजरा तालुक्यातील गाव व थीम पुढीलप्रमाणे – 1. हतीवडे – कबडडीपटूंचे गाव, 2. वाटंगी – पर्यटनस्थळांची प्रसिध्दी.

272 राधागरी विधानसभा मतदारसंघात 14 थिमॅटिक मतदानकेंद्र उभारण्यात येत आहेत.
राधानगरी तालुक्यातील गाव व थीम पुढीलप्रमाणे – 1.कांबळवाडी – क्रिडा थीम –स्वप्नील कुसाळे, 2. वळवण – मधाचे गावं, 3. कपिलेश्वर – सूंदरता व गुणवत्तापूर्ण शाळा, 4 राजर्षि शाहू वि.म.राधानगरी – राजर्षि शाहू चरित्र, 5. केद्रशाळा पुंगाव – शिष्यवृत्ती उज्वल परंपरा, 6. सरवडे – राधानगरीची वनसंपदा
भुदरगड तालुक्यातील गाव व थीम पुढीलप्रमाणे – 1. पाटगाव – मधाचे गाव, 2. तिरवडे – सुंदर व गुणवत्तापूर्ण शाळा, 3.शेणगावं- लोककलेची समृध्द परंपरा, 4. गारगोटी – राज्यातील पहिले ग्रामीण विद्यापीठ/ पिंक पोलिंग बूथ् 5. गंगापूर – कुस्ती पंढरी, 6. मुदाळ – शालेय स्पर्धा परीक्षा,
आजरा तालुक्यातील गाव व थीम पुढीलप्रमाणे – 1. किटवडे -महाराष्ट्राची चेरापुंजी, 2. दाभिल – जी. आय. मानांकन प्राप्त तांदूळ- घनसाळ.
273 कागल विधानसभा मतदारसंघात 14 थिमॅटिक मतदान केंद्र उभारण्यात येत आहेत.
कागल तालुक्यातील गाव व थीम पुढीलप्रमाणे – 1. संत रोहिदास विद्यामंदिर कागल – जैव विविधतापूर्ण मतदानकेंद्र, 2. गोपाळकृष्ण गोखले विद्यामंदिर कागल – महिला सक्षमीकरण, 3. बानगे – कुस्ती पंढरी, 4. कौलगे – सैनिकाचे गाव, 5. लिंगनूर कापशी – कापशी चप्पल, 6. करनूर – टाकाऊ पासून टिकाऊ, 7. व्हन्नूर – बालस्नेही पंचायत 8. बहिरेवाडी – जे.पी. नाईक शिक्षणतज्ञ 9. मुरगूड – वनराई, 10 म्हाकवे – गुणवंत शाळा, 11 नानीबाई चिखली – ऐतिहासिक वारस, 12 सुळकूड – तांदूळ विविधता
गडहिंग्लज तालुक्यातील गावे व थिम पुढीलप्रमाणे- 1. गडहिंग्लज – हरित गडहिंग्लज (पशूसंवर्धन) 2. गडहिंग्लज – हरित गडहिंग्लज (पक्षीसंवर्धन)

274 कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात 13 थिमॅटिक मतदानकेंद्र उभारण्यात येत आहेत.
कोल्हापूर शहरातील मतदानकेंद्र व थीम पुढीलप्रमाणे – 1. पंचायत समिती करवीर – मुलभुत हक्क आणि कर्तव्ये, 2. राजर्षी शाहू समाज मंदिर शिवाजी मंदिर डोंबारवाडा – उद्योग, आर्थिक विकासाचा पाया 3. विद्यापीठ हायस्कूल – शांततापूर्ण जीवनाचे महत्व 4. शाहू कॉलेज, न्यू बिल्डींग, डे केअर सेंटर – लघु उद्योगाचे महत्व 5. श्री.राम विद्यालय स्कूल – आधुनिक शिक्षण पध्दती 6. प्रायव्हेट हायस्कूल – माझे कोल्हापूर सुंदर कोल्हापूर 7. गोविंदराव बोरगावकर हौसिंग सोसायटी राजारामपुरी – हरित शहर 8. आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल – टाकाऊ पासून टिकाऊ 9. ताराराणी विद्यापीठ – महिलास्नेही प्रभाग 10 पदमाराजे विद्यालय – पंचगंगा घाट 11. कोल्हापूर मनपा मुख्य इमारत – गो ग्रीन झाडे लावा झाडे वाचवा 12. वि.म. नेहरूनगर – स्त्री शक्ती, 13. जरगनगर वि.म.- शिष्यवृत्ती पॅटर्न ‍ि
275 करवीर विधानसभा मतदारसंघात 15 थिमॅटिक मतदानकेंद्र उभारण्यात येत आहेत.
करवीर तालुक्यातील गाव व थीम पुढीलप्रमाणे – 1. उजळाईवाडी – बालसंगोपन 2. कळंबा तर्फ ठाणे – गु-हाळ घर 3. महे – सेंद्रीय शेती 4. खेबवडे – सैनिकांचे गाव 5. निगवे दुमाला – पर्यावरण संवर्धन 6. शेळकेवाडी – बायोगॅस 7. बहिरेश्वर – हरित गावं 8. पाचगावं – प्लास्टीक बंदी 9. उचगावं – हरित गावं 10. कोपार्डे – बांबू लागवड 11.सावर्डे दु.- प्लास्टीक बंदी 12. वडणगे – लेक वाचवा 13. द-याचे वडगाव – पर्यावरण संरक्षण 14 गोकुळ शिरगाावं – प्लास्टीक बंदी 15. सरनोबतवाडी – लेक वाचवा
276 कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात 14 थिमॅटिक मतदानकेंद्र उभारण्यात येत आहेत.
कोल्हापूर शहरातील मतदानकेंद्र व थीम पुढीलप्रमाणे – 1. न्यु मॉडेल स्कूल विवेकानंद संस्था – कोल्हापूरची वैशिष्टये 2. विद्यामंदिर जाधववाडी – कोल्हापूर खाद्यसंस्कृती 3. सेंट झेविअर्स स्कूल – मर्दानी खेळ 4. टेंबलाई मनपा शाळा – तिरंगा थीम 5. जाधववाडी वि.म.- कचरा व्यवस्थापन 6. के.एम.सी.कॉलेज – कोल्हापूरची क्रिडा संस्कृती 7. एस्तर पॅटर्न गर्ल स्कूल – मुलभुत हक्क आणि कर्तव्ये 8. आयटीआय – उद्योग आर्थिक विकासाचा पाया 9. महाराष्ट्र हायस्कूल – शांततापूर्ण जीवनाचे महत्व 10. उद्योग भवन कलेक्टर ऑफिस – लघु उद्योगाचे महत्व 11. न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल – आधुनिक शिक्षण पध्दती 12. शिवाजी टेक्निकल संस्था सायन्स कॉलेज – माझे कोल्हापूर सुंदर कोल्हापूर 13. शीलादेवी हायस्कूल तपोवन – हरित शहर 14. केएमटी वर्कशॉप – टाकाऊ पासून टिकाऊ
277 शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात 13 थिमॅटिक मतदानकेंद्र उभारण्यात येत आहेत.
पन्हाळा तालुक्यातील गाव व थीम पुढीलप्रमाणे – 1. कोडोली 231 – महिलास्नेही गाव, 2. कोडोली 232 – वनराई, 3. बहिरेवाडी 263 – स्वच्छ व सुंदर गाव 4. नावली 251 – गुणवंत शाळा 5. माळवाडी कोतोली 303- तांदूळ विविधता 6. दळवेवाडी 285- टाकाऊ पासून टिकाऊ
शाहूवाडी तालुक्यातील गाव व थीम पुढीलप्रमाणे – 1. पेरीड 68- वनराई, 2. साळशी 171- गुणवंत शाळा 3. बांबवडे 153- महिला स्नेही गावं 4. माण 84-85 – तांदूळ विविधता 5. आळतूर धन 38 – पायाभुत सुविधायुक्त गाव 6. परळे 83- स्वच्छ हरित गाव 7. उचत 81 – टाकाऊ पासून टिकाऊ
278 हातकणंगले विधानसभा मतदारसंघात 15 थिमॅटिक मतदानकेंद्र उभारण्यात येत आहेत
हातकणंगले तालुक्यातील गाव व थीम पुढीलप्रमाणे 1. माणगांव- मुलभुत हक्क आणि कर्तव्य. 2. शिरोली पुलाची- उद्योग आर्थिक विकासाचा पाया. 3. आळते- शांतता पूर्ण जिवनाचे महत्व. 4. पट्टणकोडोली- लघु उद्योगाचे फायदे, 5. हुपरी – सिल्वर सिटी, 6. कुंभोज- आधुनिक शिक्षण पध्दती, 8. अंबप 34 ते 39- हरित गाव. 9. ऊर्दू विद्या मंदीर केंद्र क्रमांक 67- हरित गाव. 10. पेठ वडगाव- केंद्र क्रमांक 71 वडगाव हायस्कूल- वेस्ट टू वंडर, 11. पेठ वडगाव केंद्र 67 ऊर्दू विद्यामंदीर- ग्रीन एनर्जी, 12. रेंदाळ- बालस्नेही, 13. मौजे वडगाव- जलसंवर्धन, 14. रुकडी- दळणवळण क्रांती.15 इंगळी- पर्यावरण रक्षण.
279 इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात 15 थिमॅटिक मतदानकेंद्र उभारण्यात येत आहेत.
इचलकरंजी शहरातील मतदानकेंद्र व थीम पुढीलप्रमाणे- 1. शहापूर गावचावडी- स्थानिय वारसा, 2. शहापूर हायस्कूल- मी आणि माझ संविधान, 3. छत्रपती शाहू हायस्कूल- माझी वस्त्रनगरी, 4. लाल बहादूर शास्त्री शाळा क्र. 34- सांस्कृतिक विविधता, 5. पंडित जवाहरलाल नेहरु वि.म. क्र. 24- ग्रीन एनर्जी, 6. मणेरी हायस्कूल कबनूर- पर्यावरण संरक्षण, 7. शाहीर अमर शेख विद्या मंदिर 56- महिला सक्षमीकरण, 8. वेणुताई चव्हाण वि.म.क्र. 54- तरुणांचे सक्षमीकरण,9. विठ्ठल रामजी शिंदे शाळा क्र. 21- शिक्षण आणि ज्ञान, 10. सरस्वती हायस्कूल ॲण्ड ज्यु. कॉलेज भोनेमळा- आंतरराष्ट्रीय एकात्मता, 11- नाकोडा हिंदी मेडियम स्कूल व शाळा क्र. 19- कला आणि क्रीडा, 12- बाबुराव आव्हाळे शाळा क्र. 51- आरोग्य आणि कल्याण, 13. अण्णा रामगोंडा पाटील शाळा क्र. 5 विद्यानिकेतन भाजी मंडई समोर- अपारंपारिक उर्जा, 14. नगरपालिका शाळा क्र. 35 जवाहरनगर- लोकसहभाग, 15. नगरपालिका शाळा क्र. 7- मुलभूत हक्क आणि कर्तव्य.

280 शिरोळ विधानसभा मतदारसंघात 15 थिमॅटिक मतदानकेंद्र उभारण्यात येत आहेत
1. धरणगुत्ती 139- क्षारपड जमीन विकास, 2. आगर 110- उपजिविका, 3. हेरवाड 257- अपारंपारिक उर्जा, 4. येड्राव 160- महिला सक्षमीकरण, 5. दत्तवाड 298- पंचायत सुशासन, 6. दानोळी 10- स्त्री पुरुष समानता, 7. संभाजीपूर 79- बालस्नेंही, 8. गणेशवाडी 237- जलसमृध्दी, 9. शिरोळ न.पा. 119- मी आणि माझे संविधान, 10. शिरोळ न.पा. 120- जागतिक हवामान बदल, 11. शिरोळ न.पा. 128- घनकचरा व्यवस्थापन, 12. जयसिंगपूर न.पा. 66- मतदानाचा प्रवास, 13. जयसिंगपूर न.पा. 98- पिंक मतदान केंद्र, 14. कुरुंदवाड न.पा. 219- लघुउद्योगाचे महत्व, 15. करुंदवाड न.पा. 221- लेक वाचवा.

🤙 8080365706