कोल्हापूर : हसूर दुमाला (ता: करवीर) येथे काँग्रेस व शेकाप गटाला मोठे खिंडार पडले आहे. या गावातील हजारो कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.हसूर दुमालाचे माजी सरपंच अजित पाटील तसेच शेकाप चे श्रीपती पाटील यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, खासदार धैर्यशील माने, चंद्रदीप नरके यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी हनुमान दूध संस्थेचे चेअरमन युवराज पवार, ग्रामपंचायत सदस्य जालिंदर कांबळे, गणेश कासार, अनिता पाटील, मा.ग्रामपंचायत सदस्य राजाराम पाटील, दिलीप पाटील, दीपक भोईटे, शंकर भोईटे, सरदार कांबळे, दिगंबर कांबळे, सोनाबाई भोईटे, भीमराव भोईटे यांच्यासह संस्थांचे पदाधिकारी व हजारो कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे स्वागत केले.