कोल्हापूर: विधानसभा निवडणूक 2024 च्या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा संपन्न झाली. यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी उपस्थित राहून विराट जनसागराशी संवाद साधला.योगीजींनी मतदारांशी संवाद साधत नवचैतन्य निर्माण केले तसेच महायुती सरकारच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले. योगींचें प्रभावी व प्रेरणादायी शब्द तरुणांच्या मनात नक्कीच हिंदुत्वाचा हुंकार भरतील.
2024 ची विधानसभेची निवडणूक ही महायुतीकडून विकासाच्या मुद्द्यावर लढवली जात आहे. गेल्या अडीच वर्षांमध्ये महायुती सरकारने विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. राज्यातील सर्वसामान्य जनतेसाठी अनेक योजना अमलात आणल्या आहेत. परंतु या योजनांबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अपप्रचार सुरू केला आहे. मात्र राज्यातील जनता आता सुज्ञ आणि जाणकार आहे. मतपेटीच्या रूपातून महाविकास आघाडीला ती धडा शिकवेल व पुन्हा एकदा राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होईल, असा विश्वास व्यक्त केला.
धनंजय महाडिक यांनी महाविकास आघाडीच्या काळामध्ये राज्यातील प्रत्येक प्रकल्पाला स्थगिती देऊन महाराष्ट्र अधोगतीला घेऊन जाण्याचं काम महाविकास आघाडीने केलं आहे. त्यामुळे या सरकारची स्थगिती सरकार अशी ओळख निर्माण झाली होती परंतु गेल्या अडीच वर्षांमध्ये महायुती सरकारने रखडलेली सर्व विकासकामे पूर्ण केली आहेत. महायुती सरकारचा हा ‘विकासाचा रथ’ अविरतपणे सुरु ठेवण्यासाठी राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचे सरकार निवडून देऊया. त्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या सर्व 10 जागा मोठ्या मताधिक्याने निवडून देऊया, असे आवाहन यावेळी उपस्थितांना केले.
यावेळी धैर्यशील माने, अमल महाडिक, राजेश क्षीरसागर , चंद्रदीप नरके, अशोकराव माने, महेश जाधव, विजय जाधव, जयंत पाटील सर, . शौमिका महाडिक, उत्तम कांबळे यांच्यासह भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी, जनसुराज्य शक्ती पक्ष व मित्रपक्ष महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..