कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ उचगांव येथे निर्धार सभा संपन्न झाली. यावेळी खा धनंजय महाडिक यांनी उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला.
धनंजय महाडिक म्हणाले, महायुती सरकारने राज्यात अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्याला विविध विकासकामांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीच्या जोरावर जिल्ह्यामध्ये अनेक बदल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात ही विकासगंगा अशीच वाहती ठेवण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीचे सर्व उमेदवार आपण निवडून द्यायला हवेत. त्यामुळे येत्या 20 तारखेला आपल्या कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. अमल महाडिक यांना सर्वाधिक मताधिक्याने विजयी करूयात, असे आवाहन यावेळी उपस्थित नागरिकांना केले.
याप्रसंगी महेश जाधव, राजू संकपाळ, इरफान मनेर, महेशचौगुले, अनिल शिंदे, सतीश माळगे, एन. डी. वाइंगडे, दत्ता तोरस्कर, अभिजीत पाटील, प्रतिभा जाधव आदी उपस्थित होते.