कोल्हापूर : विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ पाचगाव येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी खासदार धनंजय महाडिक यांनी उपस्थित राहून मतदारांशी संवाद साधला.
अमल महाडिक हे जनतेच्या संपर्कात असलेले उमेदवार आहेत. तर महाविकास आघाडीचा उमेदवार हा जनतेशी संपर्क नसलेला व गेल्या पाच वर्षात एकही काम न केलेला निष्क्रिय आमदार अशी ओळख असलेला आहे.
राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुती सरकार स्थापन होणार आहे. एकनाथ शिंदे , देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली येत्या 23 तारखेला महायुतीचा ‘महाविजय’ संपन्न होणार आहे. यासाठी सर्व सुज्ञ मतदार बंधू-भगिनींनी येत्या 20 तारखेला मतदान करून अमल महाडिक यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन यावेळी केले.
यावेळी अमल महाडिक, संजय वास्कर, मनिषा वास्कर, राणी पाटील, महेश पाटील, भिकाजी गाडगीळ, आजी-माजी सैनिक
संघटनेचे सर्व पदाधिकारी व भाजपा महायुतीचे सर्व कार्यकर्ते व मतदार बधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.