कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ वडकशिवाले येथे गावभेट दौरा व बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी धनंजय महाडिक यांनी उपस्थित राहून जनतेशी संवाद साधला.
यावेळी धनंजय महाडिक म्हणाले, राज्यातील महायुती सरकारने राबवलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, शेतकरी सन्मान निधी योजना, बळीराजा मोफत वीज योजना, वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर, मुलींना मोफत शिक्षण अशा अनेक योजनांचा लाभ ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला मिळालेला आहे. याबद्दल सर्वसामान्य जनता समाधानी आहे. ही निवडणूक खऱ्या अर्थाने जनतेने हाती घेतली आहे. त्यामुळे अमल महाडिक यांचा विजय निश्चित झाला आहे. त्यामुळे येत्या 20 नोव्हेंबरला मा. अमल महाडिक यांच्या ‘कमळ’ चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.
यावेळी धनाजी पाटील, सिताराम पाटील, श्रीकांत पाटील, शंकरराव पाटील, सर्जेराव शेटके, श्रीकांत पारळे, संपतराव पाटील, आनंदराव ढेरे, नामदेव पाटील, भानुदास पाटील, हर्षद चिंदगे, युवराज पाटील यांच्यासह मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते