कोल्हापूर: कसबा बावडा येथे शाहू छत्रपती महाराज, राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आमदार सचिन पायलट आणि आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार राजू लाटकर यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली. याप्रसंगी आमदार काझी निजामुद्दीन जी, आमदार हसन मौलाना जी, निरीक्षक सुखवंतसिंह ब्रार, डी.वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष संजय डी. पाटील साहेब, श्रीराम सोसायचीचे चेअरमन संतोष पाटील, आपचे संदिप देसाई, कॉ. अतुल दिघे,कॉ. रघुनाथ कांबळे आणि कॉ. दिलीप पवार यांची उपस्थिती होती.
राज्यात शेतकरी सुखी नाहीत, व्यापारी सुखी नाहीत अशा काळात महायुतीच्या सरकारकडून धार्मिक ध्रुवीकरण केलं जात आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा निकाल हा देशाचे राजकारण बदलणार असल्याचं मत आमदार सचिन पायलट यांनी व्यक्त केलं.
सतेज पाटील म्हणाले, कसबा बावड्यानं नेहमीच मला पाठबळ दिलं आहे. राजू लाटकर या सामान्य कार्यकर्त्याला विजयी करून राज्यभरात वेगळा संदेश गेला पाहीजे. या संघर्षाच्या काळामध्ये महाविकास आघाडीचे हात बळकट करण्यासाठी राजू लाटकर यांना विजयी करण्याचं आवाहन मतदारांना केले.
यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पवार, माजी महापौर वंदना बुचडे, स्वाती यवलुजे, माजी नगरसेवक मोहन सालपे, डॉ. संदिप नेजदार, भारती पोवार यांच्यासह दिपक क्षीरसागर, विलास दाभोळकर, सुनिल पोवार, हर्षल सुर्वे, अक्षय खोत, राहूल माळी, मेघा माळी, प्रशांत पाटील, आनंदा करपे,राहुल आळवेकर तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.