कोल्हापूर : शिरोळ विधानसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार गणपतराव पाटील यांच्या प्रचारार्थ जयसिंगपूर येथे सभा पडली.
कोणत्याही दबावाला बळी न पडता विकासगंगा शिरोळ तालुक्यात आणण्यासाठी गणपतराव पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन या सभेत सतेज पाटील यांनी आवाहन केले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले, दक्षिण भारत जैन सभा उपाध्यक्ष आण्णासो हावळ, प्रा. सुकुमार कांबळे, महादेव धनवडे, चंगेजखान पठाण, शिवसेनेचे वैभव उगळे, कॉम्रेड आप्पा पाटील, संजय अनुसे, रावसाहेब भिलवडे, अमरसिंह निकम, राजू वडर, मधुकर पाटील, स्वाती सासणे, मिनाज जमादार,रमेश शिंदे, तातोबा पाटील, नितीन बागे, राजू आवळे, भवानीसिंह घोरपडे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.