बाजार भोगाव (सुदर्शन पाटील) : करवीर विधानसभा मतदारसंघातील जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्या वरती पन्हाळा तालुक्यातील मानवाड पैकी गुरववाडी येथे काल संध्याकाळी साडेअकराच्या सुमारास अज्ञात व्यक्तींकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की संताजी घोरपडे हे काल रविवार दिनांक १७ नोव्हेंबर रोजी कोलिक पडसाळी परिसरात प्रचार दौऱ्यानिमित्त गेले होते यावेळी परत येत असताना रात्री साडे अकराच्या सुमारास मानवाड पैकी गुरववाडी येथे आल्यानंतर अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गाडीला हात केला यावेळी कोणीतरी मतदार असतील म्हणून त्यांनी गाडी थांबवली तेव्हा समोर आलेल्या अज्ञात पाच ते सहा व्यक्तींनी त्यांच्यावरती हल्ला केला व समोर असलेल्या शेतामध्ये पलायन केले जखमी संताजी घोरपडे यांना कळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे दरम्यान या घटनेची माहिती मिळताच जनसुराज्य शक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात मोठी गर्दी केली होती या घटनेची नोंद कळे पोलिस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास कळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कळे पोलीस करीत आहेत