कोल्हापूर : वरणगे, पाडळी बुद्रुक, चिखली, आंबेवाडी, वडणगे या ठिकाणी करवीर मतदारसंघाचे महायुती शिवसेनेचे उमेदवार चंद्रदीप नरके यांचा संपर्क दौरा झाला. या दौऱ्याला लोकांचा उदंड प्रतिसाद होता. अतिशय उत्साहाने लोकं सहभागी होत होते. यावेळी नरके म्हणाले, माझ्या स्वागताला माता-भगिनींची ओवाळणी आणि तरुणांची बाईक रॅली, म्हणूनच मी म्हणतो ही फक्त गर्दी नाही तर विजयाची नांदी आहे. मी आमदार होणे म्हणजे स्वतः आपण आमदार होणे, हे लोकांचं बोलणं, यावरून माझ्यावरील लोकांच्या विश्वासाबद्दल समाधानी आहे.
यावेळी महायुतीचे पदाधिकारी, विविध सामाजिक, राजकीय, सहकारी संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, प्रिंट व इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे पत्रकार बांधव आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.