शिवाजी विद्यापीठातील ,शिक्षणशास्त्र अधिविभागामध्ये राष्ट्रीय शिक्षक दिन साजरा

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील शिक्षणशास्त्र अधिविभागामध्ये ‘राष्ट्रीय शिक्षण दिवस’ साजरा करण्यात आला.स्वातंत्र्यानंतरचे देशाचे पहिले शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त ११ नोव्हेंबर, २०२४ रोजी ” Right to Learn” या संकल्पनेवरती आधारित हा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी शिक्षणशास्त्र विभागप्रमुख डॉ. चेतना सोनकांबळे यांनी या कार्यक्रमाचे पुष्प अभिवादन केले.सर्व शिक्षकांनी यावेळी डॉ.अबुल कलाम यांच्या प्रतिमेस अभिवादन केले तथा विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले , विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त करताना ‘Right to Learn ‘ही संकल्पना स्त्रियांना , समाजातील सर्व घटकांना या अधिकारामुळेच शिक्षणाची संधी व सर्वागीण विकासाची संधी मिळाली असे मनोगत व्यक्त केले.

 

 

शिक्षणशास्त्र अधिविगप्रमुख डॉ.चेतना सोनकांबळे यांनी मार्गदर्शन करताना “डॉ. मौलाना अबुल कलाम आझाद, छत्रपती शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर व मा. ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा, सामाजिक सुधारणा व समाजातील शैक्षणिक अधिकारासाठी केलेल्या कार्याचा वारसा पुढे नेण्याविषयी शिक्षकांना मार्गदर्शन केले.”या कार्यक्रमासाठी डॉ. रुपाली संकपाळ, डॉ. विद्यानंद खंडागळे, डॉ. सुप्रिया पाटील, सरस्वती कांबळे, सारिका पाटील त्याचप्रमाणे श्रीराम सोनवणे प्राध्यापकवृंद व संगीता चंदनवाले, संजना भालकर , संगीता माने, ममता घोटल, संजय चव्हाण हे संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश पाटील यांनी केले. त्याचप्रमाणे कार्यक्रमाची प्रस्तावना प्राची पाटील तर राहुल माने व संगीता पांडे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. अमिता चौगुले यांनी या कार्यक्रमाचे आभार व्यक्त केले.