कोल्हापूर : राजेश क्षीरसागर यांना रेणुका भक्त संघटना कोल्हापूर शहर यांचा जाहीर पाठिंबा मिळाला. सौंदत्ती यात्रेला जाण्यासाठी रेणुका भक्तांची प्रवास यात्रा सुकर व्हावी यासाठी प्रत्येक वर्षी एस. टी. चे प्रवास भाडे व खोळंबा आकार यामध्ये सवलत मिळावी यासाठी रेणुका भक्त संघटना राजेश क्षीरसागर यांच्याकडे येतात आणि त्यांच्या विनंतीचा मान ठेवून क्षीरसागर देखील त्याचा पाठपुरावा करून त्यांना सवलत मिळावी यासाठी यशस्वी प्रयत्न करत असतात.
आज त्यांच्या मिळालेल्या पाठिंब्यामुळे आई रेणुका देवीचा आशीर्वादच मिळाला असुन येणाऱ्या काळात लागेल ती मदत करणार असल्याचे क्षीरसागर यांनी त्यांना आश्वस्थ केले.