कोल्हापूर : शहरामध्ये मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी महापालिकेच्यावतीने विविध उपक्रमाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. आज सकाळी कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात महापालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी प्रतिज्ञा घेतली. ही प्रतिज्ञा प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी स्वत: वाचून उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना दिली.
यामध्ये “आपल्या देशाच्या लोकशाही परस्परांचे जतन करु आणि मुक्त नि:पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदार करु ” अशी प्रतिज्ञा घेण्यात आली.
यानंतर प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी महापालिकेच्या सर्व अधिकारी कर्मचारी यांनी 100 टक्के मतदार करावे. 274 दक्षिण व 276 उत्तर मतदार संघाती मतदान केंद्राच्या परिसरातील नागरिकांच्या घरी जाऊन त्यांना भेटून मतदानाचे महत्व जनजागृती द्वारे सांगण्यात येत आहे. यासाठी कमी मतदान होणाऱ्या केंद्राच्या परिसरात बॅनर, पोस्टर्स लावण्यात येत आहे. यासाठी दिवाळीपुर्वीच शहरातील वेगवेगळ्या आस्थापनाना, मॉल, मोठे बझार या ठिकाणी दीपावलीच्या शुभेच्छा म्हणून मतदान जनजागृतीचे स्टिकर्सद्वारे वाटप करण्यात आले. तसेच परवाना, अतिक्रमण, घरफाळा विभाग व सर्व विभागीय कार्यालयांनी ही स्टिकर्स वाटप केली आहेत. त्याचबरोबर महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांमार्फत पालकांना पत्रव्यवहार सायकल रॅली, व्यापा-यांमार्फत प्रत्येक बिलावर मी जागरूक नागरीक देशाचा, हक्क बजावणार मतदानाचा हा शिक्का मारणे, लोकशाही दौड असे विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी शहरातील सर्व मतदारांनी, महापालिकेच्या कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील सर्व मतदारांनी दि.20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदानाचा 100 टक्के हक्क बजावावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उप-आयुक्त साधना पाटील, पंडीत पाटील, सहा.आयुक्त नेहा आकोडे, संजय सरनाईक, स्वाती दुधाने, उज्वला शिंदे, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, प्रशासन अधिकारी आर व्ही कांबळे, जल अभियंता हर्षजीत घाटगे, नगरसचिव सुनील बिद्रे, वरिष्ठ लेखापरिक्षक वर्षा परिट, कामगार अधिकारी राम काटकर, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.