कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचा शिवसेना पक्षाचा महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ सदर बाझार ते विचारे मळा प्रचार फेरी काढण्यात आली. या प्रचार फेरीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वच जण या प्रचार फेरीमध्ये सामील झाले होते.

काही वरिष्ठ मंडळींनी देखील प्रामुख्याने प्रचार फेरीमध्ये सहभाग घेतला. प्रचार फेरी दरम्यान बऱ्याच ठिकाणी माता भगिनींकडून क्षीरसागर यांचे औक्षण करण्यात आले. लोकांच्या माझ्यावरील प्रेमाची मी परतफेड माझ्या कामातून नक्की करेन असा विश्वास राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
