आलास : राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रचारार्थ येथील सय्यद सादात पीर दर्ग्याला गलेफ अर्पण करून विजयाचा निर्धार करण्यात आला. गावातील प्रमुख मार्गावरून आमदार यड्रावकर यांनी मतदारांशी संवाद साधला.गावातून काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला.

येथील झेंडा चौक येथे सभा संपन्न झाली.यावेळी अबु शेख,धनपाल बोरगांवे यांनी आपल्या मनोगतातून आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आलास गावाला दिलेल्या भरगोस निधी दिल्याबद्दल आभार व्यक्त करून शिरोळ तालुक्याचा विकास साधत असताना जात – पात पाहिली नाही, त्यामुळे यापुढेही गांवच्या विकासासाठी आमदार यड्रावकर यांच्या मागे ठामपणे उभे राहून त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडूण आणण्याचा निर्धार केला.
यावेळी रणजीत पाटील,मुनिर शेख, स्मिता कदम,उपसरपंच सोनाली कोळी, फजल पटेल,गणपतराव मगदूम, महावीर उपाध्ये,रवी शेडबाळे,प्रकाश मगदूम,राहुल शेडबाळे,प्रकाश दानोळे, बाळासो शेडबाळे,अॅड प्रकाश भेंडवडे, हबीब पटेल,अल्ताफ पटेल,पप्पू मोरे, अशोक गीताजे,रफिक मुजावर,अशोक गीताजे,सुरेंद्र बोरगावे,बापू कोळी प्यारेसाब साहेबवाले,मुसा इचलकरंजे, नजीर मुजावर,फरीद शिकलगार,शफी कुरणे,अबू शेख,दस्तगीर शेख,महावीर पोमाजे,कल्लाप्पा परीट यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरपंच सचिन दानोळे यांनी आभार मानले.
