बुबनाळ : स्व.शामरावअण्णा पाटील यांचे स्वप्न आमदार डॉ.यड्रावकर यांनी पूर्ण केले आहे. शिरोळ तालुक्यासाठी निधी खर्च करताना त्यांनी कोणतीही जात पाहिली नाही, कोणताही धर्म पाहिला नाही, त्यामुळेच स्व.शामरावअण्णांचे विचार त्यांनी पुढे सुरु ठेवल्यामुळे आमदार यड्रावकर यांचा विजय निश्चित असून त्यांच्या विजयाची सभा बुबनाळमध्येच घेणार असल्याचा विश्वास जेष्ठ नेते जगन्नाथ जाधव यांनी व्यक्त केला.राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रचारार्थ बुबनाळ येथे जनसंवाद यात्रा संपन्न झाली.येथील झालेल्या सभेत ते बोलत होते.

यावेळी सुरेश शहापुरे,माजी सरपंच व जवाहरचे संचालक सुकुमार किणिंगे, माजी सरपंच सुप्रिया मालगावे यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी दिलावर मकानदार,अलिशान ग्रुपचे सर्व पदाधिकारी,प्रमोददादा पाटील,रणजित पाटील,राकेश खोंद्रे, मुकूंद गावडे,पोपट पुजारी,स्मिता कदम,आसमा पटेल,सरपंच शिवलिला ऐनापुरे,उपसरपंच रमेजा नदाफ,सदस्य अविनाश ऐनापुरे,मौला झांभरे,सुरेश शहापुरे,जगन्नाथ जाधव,रंगराव जाधव, अजित शहापुरे,शितल मांजरे,रविंद्र शहापुरे,अण्णासो राजमाने,विद्याधर मरजे,पवन मरजे,जवाहर मरजे, नाभिराज मरजे,संजय मरजे,रावसो गणे,दिलावर कुन्नुरे,प्रकाश मरजे,राहुल हेगाण्णा,माजी सरपंच अजित शहापुरे, कुमार किणिंगे,कलंदर मकानदार,सुरेश मरजे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
